गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात सुट्टीसाठी भारतात गेल्यामुळे स्प्रिंग अर्थात वसंत ऋतूचं आगमन मला पाहताच आलं नाही. या वर्षी मात्र ‘साकुरा’ फुलताना छायाचित्रं काढायला विसरायचं नाही असं मनाशी अगदी ठरवलं होतं. पण गेल्या आठवड्यात कामाच्या गराड्यापुढे दिवसा प्रयोगशाळेतून बाहेरच पडता आलं नाही. परवा सकाळी सहज घराच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर साकुरा चक्क पूर्णपणे बहरात होता. छे.. नेमकं याच दिवसात मला काम लागावं आणि मी पुन्हा एकदा साकुरा बहरताना छायाचित्रं काढायला मुकावं..आता यासाठी आणखी एक वर्ष थांबावं लागणार या विचारानं त्या दिवशी थोडा हिरेमोडच झाला. पण बाहेर पडल्यावर आजूबाजूला सर्वत्र ऐन बहरात आलेला साकुरा पाहिला आणि उदास झालेलं मन साकुरासारखंच क्षणात फुलून आलं. साकुरा फुलताना पाहता आला नाही किंवा त्याची छायाचित्रं काढता आली नाहीत याच्या दुःखापेक्षा बहरलेला साकुरा पाहण्याचं सुख कित्येक पटीनं अधिक होतं. त्यानंतर दोन-तीन दिवस रोज साकुरा पाहण्यात आणि ‘हानामी’ची मजा लुटण्याच्या कल्पनेत अगदी छान गेले.
तुम्ही म्हणत असाल हा साकुरा काय प्रकार आहे आणि ही हानामी कशाशी खातात? काय आहे, जपानबद्दल माहिती वाचताना, जपानी भाषेचा थोडासा छळ सहन करावा लागणारच, नाही का? ठीक आहे. सांगतो. कदाचित काही जणांना माहितीही असेल. दर वर्षी वसंताची चाहूल लागताच हिवाळ्यात थंडीनं गारठून गेलेल्या आणि पानं झडलेल्या चेरीच्या झाडांना नवी पालवी फुटू लागते आणि बघता बघता चेरीचं झाड फिकट गुलाबी फुलांनी अगदी बहरुन जातं. अगदी आपल्याकडचं गुलमोहराचं झाड जसं बहरुन जातं तसंच. तसं पाहिलं तर समशीतोष्ण कटिबंधात हा प्रकार सर्वत्रच पाहायला मिळतो. यात जपानमध्ये विशेष वेगळं आहे असं काहीच नाही. याला पश्चिमेकडे चेरी ब्लॉसम म्हणतात तर इथे साकुरा. हा साकुरा जपानच्या दक्षिणेच्या टोकापासून सुरु होउन हळूहळू उत्तरेला सरकत जातो. टोकियो साधारण मध्यावर असल्यामुळे मार्चअखेरीस टोकियोमध्ये सगळीकडे साकुरानं डवरलेली झाडं दिसू लागतात आणि सगळीकडे एखाद्या उत्सवासारखं वातावरण पसरतं. शाळा, कॉलेजांना वर्षअखेरीची सुट्टी लागलेली असते. ऑफिसेस्, घरा-घरांमध्ये हानामीची वेळापत्रकं आखली जातात. ही ‘हानामी’ म्हणजे कुठलीतरी खायची गोष्ट नाही तर कुटूंब किंवा मित्रमंडळींसोबत फिरायला जाऊन चेरी ब्लॉसमची मजा लुटणे म्हणजे 'हानामी'. आता ही हानामी सहल (किंवा पिकनिक म्हणा हवं तर) घराजवळची एखादी बाग किंवा दूर कुठेतरी दुस-या गावत असणं हे ज्याच्या त्याच्या उत्साहावर अवलंबून असतं. पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हानामीचा आनंद लुटण्यासाठी एकदा तरी बाहेर पडतातच. मला तरी वाटतं अशा वातावरणात हानामी पिकनिकला न जाता कुणाला चैनच पडणार नाही. त्यामुळं या दिवसांत बागा किंवा साकुरा पाहण्यासाठी असलेली ठिकाणं गर्दीनं फुलून गेली नाहीत तरच नवल. सुट्टीच्या दिवशी तर काही पाहायलाच नको. काही ठिकाणी तर गर्दीतून वाटही काढता येत नाही. तसा हानामी पिकनिक आणि आपल्याकडची पिकनिक यात फारसा फरक नाहीच. हल्ली आपल्याकडच्या पिकनिकच्या संकल्पना बदलल्या आहेत. पण मी लहान असताना घरातल्या मंडळींबरोबर गेलेल्या पिकनिक मला चांगल्या आठवतायत. शक्यतो सगळ्या पिकनिक म्हणजे कुठल्यातरी देवस्थानला दिलेली एखादी छोटी भेटच असायची. सकाळचा वेळ तिथं पोचल्यावर देवदर्शन आटोपून आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात जाई. दुपार झाली, की जवळवासच्या कुठल्यातरी वडाच्या झाडाखाली चटई अंथरुन त्यावर जेवणाचे डबे उघडले जात. घरातून कालवून आणलेला दहीभात आणि डाळमेथीचा बेत अगदी फक्कड जमलेला असे. त्यावर मनसोक्त ताव मारला तरी नंतर ताकाचा पेला रिचवून मोठी ढेकर दिल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्याचं समाधान मिळत नसे. तश्या त्या दहीभात आणि डाळमेथीची चव इतर कुठेही आणि कितीही वेळा खाल्ली तरी येत नसे. जेवणानंतर तिथेच झाडाच्या सावलीत बायकांच्या गप्पा रंगत असत आणि परुषमंडळींची वामकुक्षी होत असे. आम्ही मुले मात्र दिवसभर कोणता ना कोणता खेळ खेळण्यात किंवा इतरांच्या खोड्या काढण्यात दंग असू. उन्हं उतरतीला लागल्यावर सामानाची आवराआवर सुरु होई आणि अंधार पडायच्या सुमारास आम्ही घरी परतत असू. त्या सहलींच्या आठवणी मनात अजूनही ताज्या आहेत. तश्या सहलींची मजा आता पुन्हा येणार नाही आणि इथं तर मुळीच येणार नाही हे माहित असलं तरी इथल्या प्रत्येक सहलीत काहीतरी वेगळं अनुभवण्याचा प्रयत्न सुरुच असतो.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एप्रिलच्या पहिल्याच रविवारी प्रयोगशाळेची हानामी सहल ठरली. पण रविवारी हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळं हानामीसाठी एक दिवस आधीच जायचं ठरलं. शनिवारी सकाळी ठरल्याप्रमाणे तोक्यो(टोकियो) मधली कमी गर्दी असणारी एक छोटीशी बाग निवडून सगळे सदस्य तिथे जमा झाले. हवेतला किंचीत गारठा आणि लख्ख सूर्यप्रकाशामुळे वातावरण अगदी आल्हाददायक होतं. प्रा. कुरोदा, म्हणजे माझे मार्गदर्शकही त्यांच्या कुटुंबियांसमवेत आले होते. त्यांच्या पत्नीने घरातून आमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. थोडा वळ बागेत फेरफटका मारुन साकुराचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवलं. प्रत्येकाकडे कॅमेरा असल्यामुळे छायाचित्रांना काही तोटा नव्हताच. बागेत फारशी गर्दी नसली तरी प्रयोगशाळेतील काही मुलांनी आधीच जाऊन जागा पकडून ठेवली होती. तिथे एका चेरीच्या झाडाखाली मेणकापड अंथरुन मंडळींनी त्यावर बैठक मारली. वरती जणू साकुराचं छतच तयार झालं होतं. पेयपानाचा कार्यक्रम आटोपल्यावर मंडळींनी जेवणाचे डबे उघडले. जपानी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत गप्पा रंगल्या. प्रा. कुरोदांचा छोटा मुलगा योशितोची दंगामस्ती आणि खोड्यांमुळे सगळ्यांची चांगलीच करमणूक होत होती. दुपारी यथावकाश जेवण आटोपून गप्पा संपल्यावर एकेक सदस्य निघू लागला. मग सगळ्यांनीच आवराआवर करायला सुरुवात केली. तीन-साडेतीनच्या सुमारास साफसफाई करुन सर्वजण परत निघाले. मी आणि काही मित्र भारतीय दूतावासात असलेला ‘साकुरा बझार’ पाहण्यासाठी निघालो.
दरवर्षी ‘कुदानशिता’ इथं असणा-या भारतीय दूतावासात ‘साकुरा बझार’ भरतो. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमधील खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल आणि दूतावासासमोर असणारी साकुरानं फुलून गेलेली प्रसिध्द बाग हे या साकुरा बझारचं आकर्षण असतं. दूतावासात जाईपर्यंतच चार वाजले. कुदानशिता स्टेशनपासून दूतावासापर्यंतचा रस्ता गर्दीनं फुलून गेला होता. जपानी मित्रांना साकुरा बझारमधील मराठी मंडळाच्या स्टॉलमधले बटाटेवडे खायला घालायचा विचार होता. पण बटाटेवडे केव्हाच संपून गेले होते आणि उरलेले पदार्थही संपण्याच्या बेतात होते. रांगेत उभे असताना अर्ध्यातच सगळे पदार्थ संपल्याची घोषणा झाली. त्यामुळे मग समोरच्या प्रसिध्द बागेत चक्कर मारण्यास निघालो. बागेतील रस्त्यावर गर्दी मावत नव्हती. रस्त्याच्या दुतर्फा फुललेला साकुरा पाहताना लोकांचा उत्साह ओसंडून वाहात होता. काही लोक त्याची चित्रं रेखाटत होते तर काही हौशी आजोबा मोक्याची जागा पटकावून आपला जुना कॅमेरा स्टॅंडवर लावून साकुराची छायाचित्रं काढण्यात दंग होते. एकंदरीतच गर्दीला उत्सवाचं स्वरुप आलं होतं. एक मोक्याची जागा पकडून मीही छायाचित्रांची हौस भागवून घेतली. पण गर्दीमुळे फारशी मनासारखी छायाचित्रं काढता आली नाहीत. त्यामुळं पुढच्या वर्षी एखाद्या निवांत ठिकाणी छायाचित्रं काढायचा निश्चय करुन परतीची लोकल पकडली.
हा साकुराचा बहर फार फार तर एक आठवडा किंवा दहा दिवस टिकतो. तोक्योमधील साकुरा आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण उत्तरेला काही मैलांवर तो नुकताच सुरु झालाय. या महिन्याच्या अखेरीस मला उत्तरेकडील 'नागानो' राज्यात जाण्याची संधी मिळतेय. पाहूया त्यावेळी साकुराला आणखी एकदा भेटण्याची संधी मिळते का?

14 comments:
Hope u'll get the chance to encash the Sakora next year...
Btw, BaTaTa wada reminds me of my trip to Boston. Somebody had told me that we get a good BaTaTa wada over there. I tried to find that shop for 2-3 days, but cudn't got it :(
I can understand how u wud have felt after listening the announcement that Marathi food is over :(
विशाल, साकुराचे वर्णन आणि सोबतचे फोटोज दोन्ही अप्रतिम. पूर्वरंग मधले वर्णन आठवले. By the way, तू flickr.com किंवा तत्सम साईट्सवर आहेस का?
मंदार, नंदन,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
नाही, मी flickr.com किंवा तत्सम साईट्सवर सध्यातरी नाही आहे कारण त्यांचं प्रयोजन मला नक्की कळालेलं नाही. पण flickr.com वर खातं उघडायचा विचार आहे.
Photo sharing sathi upayukt. Tasech eka vishisht vishayavar etarnni kadhalele photos pahta yetat - e.g. http://www.flickr.com/photos/tags/sakura/.
विशल्या,
जपानला येऊ न शकल्याचं एवढं वाईट वाटत नाही.. इतक हुबेहुब वर्णन आहे.. :)..
Really after reading this blog I can write in my reesume that I worked in japan too.. and can convince people by giving references from here.
keep it up
नयनरम्य छायाचित्रे आणि तितकेच सुंदर वर्णन वाचून आनंद झाला. वसंत फुलला ह्याला साकुरा हा (भावार्थाने) छान प्रतिशब्द कळला. :)
विशाल फ़ोटॊ तर सुरेख आहेतच,पण वर्णन त्याहुनही जमुन गेलय.मस्त. आवडल एकदम.
आमच्याकडे पण आता स्प्रिंगमुळ वातावरण इतक सुरेख झालय ना!आणि त्यात माझ्या गावात wild flowers साठी प्रसिद्ध असलेला एक खास रस्ता आहे. येत्या काही दिवसात संपुर्ण रस्ता फ़ुलानी भरुन जाईल.:)
अमित, शैलेश, रजनीगंधा,
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
Hi Vishal,
I used to read ur blog regularly. But first time I am responding here...First of all congrats for the gre8 photos and lovely description.. You have very good eye in photography specially layout and color scheme.
Please keep it up with your wonderful writing with marvelous snaps...all the best.
Hi vishal,
I have read u on manogat and now i have read ur blog. i wanted to see sakura ever since i started learning japanese. Your snaps have fulfilled my wish. Thanks a lot!!!!!
btw hanami is a combination of 2 words which means seeing the flowers.(for others!!).
-Rochin.
साकुरा आवडलं.मराठी भाषकांसाठी जपानी थोडंसं तरी सुसह्य करणारा एखादा ब्लॉग केला तर आम्हालाही जपान जरास कळायला मदत होईल.
Apratim!!
Kolhapuri mansacha blog baghun jeev sukhavla! Asech lihit raha, all the best :)
Ojas (kolhapuri!!)
रोचीन, ओजस आणि निनावी व्यक्ती,
तुमचा प्रतिसाद वाचून आनंद झाला. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
गणेश,
कमीत कमी जपानी आणि जास्तीत जास्त मराठी शब्द वापरायचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. पण काही विशिष्ट शब्द उदा. विशेषनामं किंवा ज्या गोष्टी फक्त जपानमध्येच पाहायला मिळतात त्यांच मूळं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी जपानीतच लिहीले आहेत. आणि वेळोवेळी त्यासाठी मराठी प्रतिशब्दही लिहीले आहेतच.
धन्यवाद.
Amazing blog.. Vishal, overall ch tuze saglech articles mast ahet.. ekdam dolyasamor chitra ubhe rahate ashich varnane ahet.. mi ajunhi tula suggest karen ki tu hya collection che book kar, mhanje agdi lagech nahi tar kar nakki.. i think everyone reading ur blog regularly will agree with this.. Keep writing.
Post a Comment