Saturday, December 09, 2006

इयम् आकाशवाणी |

इयम् आकाशवाणी|संप्रति वार्ताः श्रूयंताम्| प्रवाचकः बलदेवानन्द सागरः| ...
लहानपणी आजोळी गेलं की आकाशवाणीवरच्या संस्कृत बातम्या हमखास कानावर पडायच्या. त्यात हे पहिलं वाक्य ठरलेलं असायचं. संस्कृत शिकायला नुकतीच सुरुवात झालेली असल्यामुळं पहिल्या वाक्याशिवाय काही कळायचं नाही. पुढेपुढे जसजसं शिकत गेलो, तसतसं थोडं थोडं कळायला लागलं. पण बारावीनंतर संस्कृतही सुटलं आणि रेडिओचा संपर्कही. आज का कुणास ठाऊक, अचानक हे वाक्य आठवलं. संस्कृत बातम्या ऐकाव्याश्या वाटल्या. लागलीच आकाशवाणीचं संकेतस्थळ उघडलं. तिथं बातम्या सापडल्या. आजकाल आकाशवाणी एकदम तत्पर झाली आहे. रोजच्यारोज सगळ्या भाषांमधल्या बातम्या अपडेट वगैरे करणे म्हणजे जरा जास्तच आहे नाही का? सरकारी यंत्रणांमध्ये एवढी तत्परता क्वचितच पाहायला मिळते.
आज कोणीतरी पंकजा घै नावाच्या बाई बातम्या देत होत्या. जरा अडखळत बोलत असल्यासारखं वाटत होतं. पूर्वीच्या निवेदकांसारखी त्यांची संस्कृतावर पकड आहे असं वाटत नव्हतं. पूर्वीच्या संस्कृत बातम्या ऐकताना ते निवेदक लहानपणापासून संस्कृताशिवाय आणखी कुठल्याही भाषेत बोलले नसावेत असं वाटायचं. पण तरीही आज खूप वर्षांनी पुन्हा एकदा संस्कृत बातम्या ऐकताना मजा आली. संस्कृताशी संबंध संपून बरीच वर्षं झाली. बातम्या ऐकूनही फारसं काही कळलं नाही. पण ऐकल्याचं एक वेगळंच समाधान मिळालं. कधीतरी मध्येच एखादी गोष्ट करण्याची लहर आली आणि ती पटकन करायला मिळाली की एक वेगळाच आनंद मिळतो, नाही?
 आज मनात सहज विचार आला. लहानपणी रेडिओवर आपली आवड कार्यक्रम लागायचा. त्यानंतर त्याची जागा टीव्हीनं घेतली. रंगोली, चित्रहार, छायागीत.. नंतर केबल वाहिन्यांचं जाळं आल्यावर चोवीस तास तास नको असलेल्या गाण्यांचा भडीमार सुरु झाला. आजकालच्या इंटरनेटच्या इंस्टट जमान्यात तेही मागे पडत चाललंय. आजकाल YouTube किंवा Raaga सारख्या संकेतस्थळांवर कुठलंही गाणं इंस्टंट ऐकता किंवा पाहता येतं. पण रविवारी दुपारी भरपेट जेवण आटोपून हॉलमध्ये पहुडल्यावर जरा डुलकी घ्यावी तोच अचानक कानावर पडणा-या छायागीतातल्या आवडीच्या गाण्याची सर त्याला थोडीच येणार आहे?

11 comments:

borntodre@m said...

Very true ..We had limited choices and that's why we were eagarly waiting for Sunday for Chhayageet! I DO remember that we used to come early back to home from Sunday Cricket to see it :D

Coming back to Sanskrit News ...yeah ..I remember I used to wake up with those words....I'm not sure if they are still going on (infact I don't remember when was last time that I heard Radio :( )as my sleep timings are totally upside down (I refrain myself from using proper (?) word here)..may be I should try to listen them before sleeping one day :D

Good ol' days :))

प्रिया said...

अगदी, अगदी! ते बलदेवान्दसागर किती वर्ष झाले radio वर संस्कृत बातम्या देत आहेत. मी ५-६ महिन्यांपूर्वी भारतातून आले, तोवर तरी असायचे ते सकाळच्या संस्कृत बातम्या द्यायला. किती अस्खलित उच्चार आहेत त्यांचे! पूर्वी एक मंगला कवठेकर म्हणून पण असायच्या. त्या पण छान बातम्या द्यायच्या.

आपली आवड, गीत गंगा, मन चाहे गीत, रात्री लागणारे आप की फर्माइश, बेला के फूल.... किती आठवनी काढाव्यात radio च्या! आज हे वाचल्यावर ध्यानात आलं, अरेच्चा आपण तर radio ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालो! :)

Yogesh said...

एक कोण विजयश्री: पण असायच्या. सध्या अजिबातच रेडिओ ऐकत नाही. त्यामुळे आता कोण बातम्या देतंय ते माहित नाही.

Vishal K said...

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.

Prashant M Desai said...

chhan aahe - Sanskrit was one of my fav subjects! Aatahi thodaphaar kaLata. I have the collection of most of the sanskrit scriptures, vedas and upanishads in writing(pdfs) as well as in the form of mp3s. :) Sanskrit is one of the easiest languages to learn - as far as grammer is concerned.

Kaustubh said...

I still remember Vijaya Shree reading the Sanskrit news in the wee hours of morning. I tried listening to them for a few days when Sanskrit was a new subject in the school - but the motivation behind waking up early waned rather quickly. Sigh.

Vidya Bhutkar said...

तुझी लिखाणाची भाषा,पद्धत आवडली. विषेशत: हा blog जुन्या आठवणी जाग्या करून गेला. आजही घरी परत गेल्यावर रेडिओ ऎकताना 'घरी' परत आल्यासारखं वाटतं.
छान लिहिता,असंच लिहित रहा.
-विद्या.

Vishal K said...

प्रशांत, कौस्तुभ, विद्या,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

Chintamani Thakur said...

इयम् आकाशवाणी|संप्रति वार्ताः श्रूयंताम्| प्रवाचकः बलदेवानन्द सागरः|

हि सुरवात फक्त वाचली आणि एक क्षण वाटले that I should catch a plane and go back ... थोडा वेळ आठवणीत हरवलो then after a pause, read the rest of your post and comments... felt good... really good

Vishal K said...

धन्यवाद चिंतामणी,
खरं आहे. कधीकधी अशी एखादीच ओळ आठवते आणि घराची ओढ लावून जाते.

Gayatri said...

अरे सहीच! आकाशवाणीच्या त्या दुव्याबद्दल तुला लाख लाख दुवे देत्येय :)