अखेर... मी जपानी ड्रायव्हींग लायसन्स् मिळवण्यासाठीच्या दिव्व्यातून बाहेर पडलो. खरं तर माझ्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हींग लायसन्स् आहे. पण ते वापरुन आणखी फार फार तर सहा महिने गाडी चालवता येईल म्हणून जपानी लायसन्स् मिळवायचं ठरवलं. इकडेतिकडे बरीच चौकशी केल्यावर ते मिळवणं फारच कठीण आहे असं कळालं. कित्येक जणांनी हा नाद अर्धवट सोडून दिला असंही ऐकीवात आलं. पण भारतात सरकारी कचे-यांच्या चकरा मारण्याची सवय झालेल्या माझ्यासारख्याला या जपानी सरकारी कामकाजाचा असा किती त्रास होणार आहे असा विचार करुन मी परवाना मिळवायचं नक्की केलं. घरापासून दोन तास ट्रेनचा प्रवास करुन परवाना मिळण्याच्या परीक्षा केंद्रात पोचलो. चार पैसे हातावर ठेवले की लायसन्स् घरी पोचवणारे एजंट सोडले तर तिथलं वातावरण आपल्याकडच्या R.T.O. पेक्षा फार काही वेगळं नव्हतं. लोकांची वर्दळ, गोंगाट सारं काही तसंच होतं. फरक होता तो फक्त कामातील शिस्तबद्धता आणि प्रामाणिकपणाचा.
लेखी परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच पास झालो. त्या दिवशीच्या माझ्या बॅच मध्ये टेस्ट पास करणारा मी एकटाच आहे असं तिथल्या अधिका-यानं सांगितलं. मग काय, अस्मादिकांची कॉलर एकदम ताठ. अरे काय चेष्टा आहे काय? इथल्या लोकांना जे दोन-दोन तीन-तीन प्रयत्नांनंतरही करता येत नाही ते आम्ही पहिल्याच प्रयत्नात करुन दाखवलं. मग गाडी चालवण्याच्या टेस्टसाठी एक आठवड्यानंतरची तारीख मिळाली. 'ही टेस्ट फार अवघड असते. पहिल्या प्रयत्नात कोणालाच यश मिळत नाही' असं प्रयोगशाळेतल्या मुलांनी वारंवार सांगितलं होतं. पण लेखी परीक्षेतल्या यशामुळं अजून हवेतच असलेली आमची स्वारी 'ये टेस्ट किस झाड की पत्ती' असं म्हणून काहीही तयारी न करता टेस्ट देण्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा केंद्रावर पोचली. टेस्टची वेळ झाली. अधिका-यानं मला गाडीत बसायला सांगितलं. गाडीत पुढे एक आणि मागे एक असे दोन अधिकारी बसले होते. एकाचं लक्ष फक्त माझ्या नजरेवर आणि दुस-याचं माझ्या हालचाली आणि गाडीच्या दिशेवर. त्यांना बघितल्यावर मला हळूहळू प्रयोगशाळेतल्या एकेक सहका-यांचे शब्द आठवू लागले. थोडीतरी तयारी करायला हवी होती असा विचार करतच मी गाडी सुरु करुन टेस्ट ट्रॅकवर चालवायला सुरुवात केली. अर्ध्या वाटेवरच शेजारी बसलेल्या अधिका-यांनं थांबायला सांगितलं तेव्हाच मला कळलं की ही टेस्ट इथेच संपली. मी स्टॉपलाईनच्या पुढं ६ इंच गाडी थांबवली होती. टेस्टचा निकाल तिथंच लागला. तरीही अधिकृत निकाल आणि पुढची तारीख मिळण्यासाठी आणखी चार तास वाट पहावी लागणार होती. माझ्याबरोबर एक अमेरीकन मुलगा टेस्ट देण्यासाठी आला होता. त्याची ही तिसरी वेळ होती. मला पाहिल्यावर त्याचा चेहरा जणू 'बेटा, ये तो शुरुआत है' असंच सांगत होता. मी पण मग त्याला 'बेटा, हम इतनी आसानी से हार मानने वालों में से नही है' असा चेहरा करुन उत्तर द्यायचा प्रयत्न केला. जगात कुठेही जा, सरकारी कचे-यांच्या चकरा मारण्याच्या भारतीयांच्या नशिबाचे भोग कधी चुकायचे नाहीत. आता या कचेरीच्या किती फे-या माराव्या लागतात कुणास ठावूक असा विचार करत पुढच्या आठवड्याची तारीख मिळवून घरी परतलो. दुस-या वेळीही फारशी तयारी केली नव्हती.यावेळी मात्र कसाबसा ट्रॅक पूर्ण केला. पण अधिका-यांच्या चेह-यावरचे भाव काही समाधानकारक दिसले नाहीत. निकाल कळेपर्यंत आणखी चार तास वाट पाहावी लागणार होती. मागच्या वेळचा अमेरीकन मुलगा पुन्हा याही वेळी भेटला. या वेळी मात्र त्याचा पेशन्स संपला होता. त्यानं सगळ्या सिस्टीमवर आग ओकायला सुरुवात केली. आपल्याकडच्या कामाच्या पध्दतीतून तावून सुलाखून बाहेर पडल्यामुळे मला यात नविन काहीच नव्हतं. त्यामुळे मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होतो. चार तासांनंतर अधिका-यानं निकाल जाहीर करायला सुरुवात केली. टेस्ट पास झालेली मुलं आणि मुली असा काही आनंद व्यक्त करत होती की एखाद्याला वाटावं यांना लॉटरी लागली की काय, किंवा मिस् वर्ल्डचा किताब मिळाला की काय? कदाचित जपानी लोकांच्या जीवनात दोनच गोष्टी सर्वात महत्वाच्या असाव्यात. विद्यापीठात प्रवेश आणि ड्रायव्हींग लायसन्स्. मी याही वेळी पास होण्याची आशा सोडली होती. पण अखेरीस अधिका-यानं माझं नाव पुकारलं आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. अमेरीकन महोदयांच्या नशिबानं पुन्हा एकदा त्यांना हुलकावणी दिली. दुस-याच प्रयत्नात मला मिळालेला परवाना पाहून चार-चार पाच-पाच प्रयत्नांनंतरही परवाना न मिळालेल्या लोकांची बोटं आपोआपच तोंडात गेली. काही लोकांना तर दहा प्रयत्नांनंतरही यश मिळत नाही. म्हणूनच बहुदा इथली बहुतांश जनता एखादी स्वस्तातली कार घेता येईल एवढी किंमत मोजून ड्राईव्हींग स्कूल मध्ये जात असावी. काही का असेना, आता मी जपानमध्ये गाडी चालवायला मोकळा. आता लवकरच एक 'दिल चाहता है' ची गाण्यांची सी.डी. मागवायला हवी. पण गोव्याला गाडीने जाण्यात जी मजा आहे ती इथे कुठली येणार आहे म्हणा. ठीक आहे. गोवा नाही तर नाही, इथल्या एखाद्या हिरोशिमाला जायला काय हरकत आहे? पाहू या, केव्हा मुहूर्त मिळतो ते !
Thursday, December 01, 2005
फुकुशिमा सहल
योगायोगानं एक महिन्यांच्या अंतरानं पुन्हा एकदा निसर्गरम्य ‘तोहोकु’ प्रांताला भेट देण्याची संधी मिळाली. पण या वेळी सहलीचा उद्देश निराळा होता. ‘यागामी फेस्टीव्हल’ हा आमच्या विद्यापीठाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम. या वर्षी या कार्यक्रमात आपलाही बॅंड उतरवायचा असं आमच्या प्रयोगशाळेतील मंडळींनी ठरवलं. एकेक वाद्यासाठी एकेक सदस्य जमू लागला. गायकही ठरला. कार्यक्रम १० दिवसांवर येउन ठेपला होता. पण सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता आणि जागाही. मग टोकियोपासून लांब कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात सराव करायचं ठरलं. त्यासाठी ‘तोहोकु’ शिवाय दुसरी कुठली चांगली जागा असणार? ठरलं. तीन दिवसांच्या फुकुशिमा सहलीचा आराखडा तयार झाला.
रविवारी सकाळी ७ वाजता एका ठिकाणी जमायचं ठरलं होतं. मंडळी आमची वाट पाहातच थांबली होती. जपानी मुलांबरोबर जाण्यात आणि आपण स्वतंत्र जाण्यात हाच फरक आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट कशी अगदी ठरल्याप्रमाणे व्यवस्थित. एका सेकंदाचाही फरक नाही. आम्ही मात्र ‘भारतीय वेळे’नुसार ७.१५ ला तिथे पोचलो. प्रयोगशाळेतील आम्हा दोघा ‘हिंदी’ मुलांबरोबर दोन ‘चिनी भाई’ पण होते. त्यांच्याबरोबर आम्हा १२ जणांची टीम दोन गाड्यांमधून फुकुशिमाच्या दिशेने निघाली. फुकुशिमा राज्य म्हणजे ‘तोहोकु’ प्रांताची सुरुवात. टोकियोच्या उत्तरेला ३०० कि.मी. वर फुकुशिमा राज्यात असणा-या ‘निहोनमात्सु’ या गावात आम्हाला पोचायचं होतं. तीन सदस्य संध्या
काळी उशीरा येणार असल्यामुळे जपानी गाण्यांचा आस्वाद घेत रमतगमत दुपारी १२ वाजता निहोनमात्सु ला पोचलो. दुपारचं जेवण आटोपून आरक्षित केलेल्या ‘पेन्शन’(जपानी ‘-योकान्’,’मिनशोकु’ अशा घरगुती हॉटेलांचंच एक भावंड) मध्ये पोचलो. त्या एवढ्याश्या गावात एका छोट्या ‘पेन्शन’मध्ये एका संगीतकाराच्या स्टुडीओलाही लाजवेल असा स्टुडीओ पाहून मी थक्क झालो. पेन्शनच्या सभोवतालचा परिसरही रम्य होता. तीन बाजूंना हिरवीगार शेतं आणि मागे डोंगर उतरुन गेल्यावर खळाळत वाहणारा
छोटासा झरा अशा या पेन्शनरुपी फार्महाउसमध्ये तीन दिवस बाहेरचं जग विसरुन निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी घालवायची या कल्पनेनं मन सुखावलं. ‘यागामी फेस्टीव्हल’ला अवघा एक आठवडा राहिला होता. त्यामुळे बॅंडच्या सदस्यांना वेळ घालवून चालणार नव्हतं. त्यांनी पोचल्यापोचल्या लगेच स्टुडीओचा ताबा घेतला आणि आपापली वाद्यं जोडून सरावाची तयारी सुरु केली. आम्हाला संगीतात गती नसल्यामुळे आणि जपानी गाणी म्हणण्याएवढा जपानीचा अभ्यास झाला नसल्यामुळे आम्ही आजुबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायचं ठरवलं. पेन्शनच्याएक काकूंना विचारलं असता त्यांनी जवळपासच्या २-३ ठिकाणांची नावं सांगितली. त्यात तिथलं एक प्रसिध्द प्राणिसंग्रहालय होतं. त्या प्राणिसंग्रहालयात पांढरा सिंह आणि पांढरा वाघ आहे असं ऐकिवात आलं. पण मंडळींना प्राणिसंग्रहालय पाहण्यात कोणतंही स्वारस्य नव्हतं. शिवाय ढगाळ वातावरणात पावसाची चिन्हं होतीच. त्यामुळे जवळच असलेला निहोनमात्सु ‘ज्यो’(castle) पाहण्यावर एकमत झालं.
१२व्या शतकात ‘योशित्सुने’ या सामुराई योद्धयाने ही गढी बांधली आहे. आता आपल्याकडील शनिवारवाड्याप्रमाणे इथलेही आतील अवशेष नष्ट झाले आहेत. पण बाहेरील मुख्य बांधकाम सुरक्षित आहे. प्रवेशद्वारावरील ‘योशित्सुने’च्या पुतळ्याने लक्ष वेधून घेतले.
आतमध्ये ‘योशित्सुने’चा जीवनप्रवास दृकश्राव्य देखाव्यांच्या स्वरुपात
मांडला आहे. ते देखावे आणि त्यांच्यासमोरील रंगाबेरंगी फुलांचे ताटवे पाहून मन प्रसन्न झालं. संध्याकाळी लवकर अंधार पडल्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी पेन्शनमध्ये परतलो. जेवण आटोपून ओनसेनचा आनंद लुटण्यासाठी पुन्हा एकदा बाहेर पडलो. एव्हाना पाउसही सुरु झाला होता. अर्धा-पाउण तास ओनसेनमध्ये डुंबून परतलो. रात्री थोडा वेळ बॅंडचा सराव पाहून झोपी गेलो.दुस-या दिवशी सकाळी न्याहारी उरकून ‘गोशिकीनुमा’ हे आणखी एक नयनरम्य ठिकाण पाहण्यास निघालो.
निहोनमात्सुपासून साधारण एक तासाच्या अंतरावर
हा ‘पाच तळ्यांचा समूह’ आहे. या ठिकाणाचं वैशिष्टय म्हणजे पाचही तळ्यांमधील पाण्याचा वेगवेगळा रंग. शरद ऋतुतील वनराईच्या रंगामुळे या तळ्यांचं सौंदर्य आणखीच खुलून दिसत होतं.
डोंगरांमधून हे दृश्य पाहण्यासाठी तयार केलेली पायवाट पाहून ‘ओईरासे’ची आठवण झाली. वर्णनापेक्षा ही छायाचित्रे पाहाणे उत्तम. 

तीन दिवसांच्या सुट्टीमुळे गर्दीने सगळी ठिकाणं फुलून गेली होती. ‘गोशिकीनुमा’तच दुपारचं जेवण आटोपून जपानमधील ४थ्या क्रमांकाचं सर्वात मोठं, ‘इनावाशिरो’ सरोवर पाहण्यासाठी निघालो. सरोवराच्या जवळ गाडी जात नसल्यामुळे बरंच अंतर जालून जावं लागणार होतं. शिवाय ढगाळ वातावरण आणि नंतर पाऊस सुरु झाल्यामुळे सरोवराजवळ जायचा बेत रद्द करुन आम्ही जवळपासची दुकानं आणि काचेचं वस्तूसंग्रहालय पाहून परतलो. रात्रीचं जेवण आटोपल्यावर पावसानं थोडी मोकळीक दिली. बॅंडच्या सदस्यांनाही थोडी विश्रांती हवी होतीच. त्यामुळे बाहेर ‘हानाबी’ म्हणजे फटाक्यांची आतषबाजी करायचं ठरलं.
इथं जपानमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वत्र हानाबी साजरी केली जाते. प्रत्येक शहरात उन्हाळ्यात एकदा तरी समुद्राच्या किंवा नदीच्या काठाला संध्याकाळी एक जोरदार सार्वजनिक आतषबाजीचा कार्यक्रम असतो. जपानी तरुण मुले आणि मुली पारंपारिक ‘किमोनो’ परिधान करुन हानाबीचा आनंद लुटतात. हा आतषबाजीचा देखावाही अतिशय पाहण्यासारखा असतो. शिवाय इथली तरुण मुलं बाहेर सहलीला गेल्यावर किंवा घराजवळच स्वतंत्र हानाबी साजरी करतात ती वेगळीच. आम्हीही रात्री आमच्या पेन्शनच्या बाहेर हानाबीचा आनंद लुटला. तोहोकु प्रांत टोकियोच्या उत्तरेला असल्यानं इथं हळूहळू थंडी वाढायला सुरुवात झाली होती. बाहेरच्या गारठ्यात फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद लुटताना दिवाळीचा आठवण आल्याशिवाय कशी राहील? इथले काही फटाके आपल्यासारखे असले तरी बहुतेक सर्व फटाके कमी आवाज करणारे आणि जास्त प्रकाश देणारे. पण हानाबीची खरी मजा येते ती ‘सेंको हानाबी’मध्ये. गवताच्या काडीप्रमाणे बारीक असणा-या फुलबाजीचं एक टोक सर्वांनी एकाच वेळी पेटवायचं आणि दुस-या टोकाला धरुन फुलबाजी वर जळत येताना पाहायचं. शेवटी
संपल्यावर काचेच्या फुग्यासारखा एक फुगा तळाशी तयार होतो आणि तो वा-याने किंवा छोट्याश्या धक्क्यानेही गळून पडतो. जो शेवटपर्यंत हा फुगा टिकवेल तो जिंकला. इथं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ‘सेंकोहानाबी’चा आनंद लुटतात. किंबहुना त्याच्याशिवाय हानाबी पूर्णच होत नाही. त्याला आम्हीतरी अपवाद कसा असणार? सेंकोहानाबीची अगदी अटीतटीची लढत संपवून,१५ दिवस लवकर का असेना, छोटीशी दिवाळी साजरी करुन रात्री झोपी गेलो. तिस-या दिवशी दुपारी १२ वाजता पेन्शनची मुदत संपत असल्यामुळे सकाळची न्याहारी आटोपून पेन्शनच्या मागे असणा-या झ-याकाठी थोडा वेळ चक्कर मारुन सामानाची आवराआवर सुरु केली. एव्हाना बॅंडच्या सदस्यांची तालीमही व्यवस्थित झाली होती. पेन्शनच्या काका-काकूंचा निरोप घेउन १२ वाजता परतीला निघालो. वाटेत एक छान नैसर्गिस ओनसेन आहे असं कळालं. मग गाड्या तिकडे वळवल्या. जसं चौपाटीवर गेल्यावर भेळ खाल्याशिवाय चौपाटीवर गेल्याची मजा येत नाही तसं जपानमध्ये सहलीला जाउन ओनसेनमध्ये गेलो नाही तर सहल पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. भुरुभुरु पडणा-या पावसात नैसर्गिक ओनसेनच्या गरम पाण्यात डुंबण्यात वेगळीच मजा असते. अर्धा-एक तास ओनसेनमध्ये डुंबून दुपारचं जेवण उरकून पुन्हा एकदा 'तोहोकु' सहलीच्या आठवणी मनात साठवून टोकियोच्या परतीच्या प्रवासाला लागलो.
(आणखी छायाचित्रे इथे पाहा.)
रविवारी सकाळी ७ वाजता एका ठिकाणी जमायचं ठरलं होतं. मंडळी आमची वाट पाहातच थांबली होती. जपानी मुलांबरोबर जाण्यात आणि आपण स्वतंत्र जाण्यात हाच फरक आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट कशी अगदी ठरल्याप्रमाणे व्यवस्थित. एका सेकंदाचाही फरक नाही. आम्ही मात्र ‘भारतीय वेळे’नुसार ७.१५ ला तिथे पोचलो. प्रयोगशाळेतील आम्हा दोघा ‘हिंदी’ मुलांबरोबर दोन ‘चिनी भाई’ पण होते. त्यांच्याबरोबर आम्हा १२ जणांची टीम दोन गाड्यांमधून फुकुशिमाच्या दिशेने निघाली. फुकुशिमा राज्य म्हणजे ‘तोहोकु’ प्रांताची सुरुवात. टोकियोच्या उत्तरेला ३०० कि.मी. वर फुकुशिमा राज्यात असणा-या ‘निहोनमात्सु’ या गावात आम्हाला पोचायचं होतं. तीन सदस्य संध्या
काळी उशीरा येणार असल्यामुळे जपानी गाण्यांचा आस्वाद घेत रमतगमत दुपारी १२ वाजता निहोनमात्सु ला पोचलो. दुपारचं जेवण आटोपून आरक्षित केलेल्या ‘पेन्शन’(जपानी ‘-योकान्’,’मिनशोकु’ अशा घरगुती हॉटेलांचंच एक भावंड) मध्ये पोचलो. त्या एवढ्याश्या गावात एका छोट्या ‘पेन्शन’मध्ये एका संगीतकाराच्या स्टुडीओलाही लाजवेल असा स्टुडीओ पाहून मी थक्क झालो. पेन्शनच्या सभोवतालचा परिसरही रम्य होता. तीन बाजूंना हिरवीगार शेतं आणि मागे डोंगर उतरुन गेल्यावर खळाळत वाहणारा
छोटासा झरा अशा या पेन्शनरुपी फार्महाउसमध्ये तीन दिवस बाहेरचं जग विसरुन निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी घालवायची या कल्पनेनं मन सुखावलं. ‘यागामी फेस्टीव्हल’ला अवघा एक आठवडा राहिला होता. त्यामुळे बॅंडच्या सदस्यांना वेळ घालवून चालणार नव्हतं. त्यांनी पोचल्यापोचल्या लगेच स्टुडीओचा ताबा घेतला आणि आपापली वाद्यं जोडून सरावाची तयारी सुरु केली. आम्हाला संगीतात गती नसल्यामुळे आणि जपानी गाणी म्हणण्याएवढा जपानीचा अभ्यास झाला नसल्यामुळे आम्ही आजुबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायचं ठरवलं. पेन्शनच्याएक काकूंना विचारलं असता त्यांनी जवळपासच्या २-३ ठिकाणांची नावं सांगितली. त्यात तिथलं एक प्रसिध्द प्राणिसंग्रहालय होतं. त्या प्राणिसंग्रहालयात पांढरा सिंह आणि पांढरा वाघ आहे असं ऐकिवात आलं. पण मंडळींना प्राणिसंग्रहालय पाहण्यात कोणतंही स्वारस्य नव्हतं. शिवाय ढगाळ वातावरणात पावसाची चिन्हं होतीच. त्यामुळे जवळच असलेला निहोनमात्सु ‘ज्यो’(castle) पाहण्यावर एकमत झालं.
१२व्या शतकात ‘योशित्सुने’ या सामुराई योद्धयाने ही गढी बांधली आहे. आता आपल्याकडील शनिवारवाड्याप्रमाणे इथलेही आतील अवशेष नष्ट झाले आहेत. पण बाहेरील मुख्य बांधकाम सुरक्षित आहे. प्रवेशद्वारावरील ‘योशित्सुने’च्या पुतळ्याने लक्ष वेधून घेतले.
आतमध्ये ‘योशित्सुने’चा जीवनप्रवास दृकश्राव्य देखाव्यांच्या स्वरुपात
मांडला आहे. ते देखावे आणि त्यांच्यासमोरील रंगाबेरंगी फुलांचे ताटवे पाहून मन प्रसन्न झालं. संध्याकाळी लवकर अंधार पडल्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी पेन्शनमध्ये परतलो. जेवण आटोपून ओनसेनचा आनंद लुटण्यासाठी पुन्हा एकदा बाहेर पडलो. एव्हाना पाउसही सुरु झाला होता. अर्धा-पाउण तास ओनसेनमध्ये डुंबून परतलो. रात्री थोडा वेळ बॅंडचा सराव पाहून झोपी गेलो.दुस-या दिवशी सकाळी न्याहारी उरकून ‘गोशिकीनुमा’ हे आणखी एक नयनरम्य ठिकाण पाहण्यास निघालो.निहोनमात्सुपासून साधारण एक तासाच्या अंतरावर
हा ‘पाच तळ्यांचा समूह’ आहे. या ठिकाणाचं वैशिष्टय म्हणजे पाचही तळ्यांमधील पाण्याचा वेगवेगळा रंग. शरद ऋतुतील वनराईच्या रंगामुळे या तळ्यांचं सौंदर्य आणखीच खुलून दिसत होतं.
डोंगरांमधून हे दृश्य पाहण्यासाठी तयार केलेली पायवाट पाहून ‘ओईरासे’ची आठवण झाली. वर्णनापेक्षा ही छायाचित्रे पाहाणे उत्तम. 

तीन दिवसांच्या सुट्टीमुळे गर्दीने सगळी ठिकाणं फुलून गेली होती. ‘गोशिकीनुमा’तच दुपारचं जेवण आटोपून जपानमधील ४थ्या क्रमांकाचं सर्वात मोठं, ‘इनावाशिरो’ सरोवर पाहण्यासाठी निघालो. सरोवराच्या जवळ गाडी जात नसल्यामुळे बरंच अंतर जालून जावं लागणार होतं. शिवाय ढगाळ वातावरण आणि नंतर पाऊस सुरु झाल्यामुळे सरोवराजवळ जायचा बेत रद्द करुन आम्ही जवळपासची दुकानं आणि काचेचं वस्तूसंग्रहालय पाहून परतलो. रात्रीचं जेवण आटोपल्यावर पावसानं थोडी मोकळीक दिली. बॅंडच्या सदस्यांनाही थोडी विश्रांती हवी होतीच. त्यामुळे बाहेर ‘हानाबी’ म्हणजे फटाक्यांची आतषबाजी करायचं ठरलं.
इथं जपानमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वत्र हानाबी साजरी केली जाते. प्रत्येक शहरात उन्हाळ्यात एकदा तरी समुद्राच्या किंवा नदीच्या काठाला संध्याकाळी एक जोरदार सार्वजनिक आतषबाजीचा कार्यक्रम असतो. जपानी तरुण मुले आणि मुली पारंपारिक ‘किमोनो’ परिधान करुन हानाबीचा आनंद लुटतात. हा आतषबाजीचा देखावाही अतिशय पाहण्यासारखा असतो. शिवाय इथली तरुण मुलं बाहेर सहलीला गेल्यावर किंवा घराजवळच स्वतंत्र हानाबी साजरी करतात ती वेगळीच. आम्हीही रात्री आमच्या पेन्शनच्या बाहेर हानाबीचा आनंद लुटला. तोहोकु प्रांत टोकियोच्या उत्तरेला असल्यानं इथं हळूहळू थंडी वाढायला सुरुवात झाली होती. बाहेरच्या गारठ्यात फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद लुटताना दिवाळीचा आठवण आल्याशिवाय कशी राहील? इथले काही फटाके आपल्यासारखे असले तरी बहुतेक सर्व फटाके कमी आवाज करणारे आणि जास्त प्रकाश देणारे. पण हानाबीची खरी मजा येते ती ‘सेंको हानाबी’मध्ये. गवताच्या काडीप्रमाणे बारीक असणा-या फुलबाजीचं एक टोक सर्वांनी एकाच वेळी पेटवायचं आणि दुस-या टोकाला धरुन फुलबाजी वर जळत येताना पाहायचं. शेवटी
संपल्यावर काचेच्या फुग्यासारखा एक फुगा तळाशी तयार होतो आणि तो वा-याने किंवा छोट्याश्या धक्क्यानेही गळून पडतो. जो शेवटपर्यंत हा फुगा टिकवेल तो जिंकला. इथं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ‘सेंकोहानाबी’चा आनंद लुटतात. किंबहुना त्याच्याशिवाय हानाबी पूर्णच होत नाही. त्याला आम्हीतरी अपवाद कसा असणार? सेंकोहानाबीची अगदी अटीतटीची लढत संपवून,१५ दिवस लवकर का असेना, छोटीशी दिवाळी साजरी करुन रात्री झोपी गेलो. तिस-या दिवशी दुपारी १२ वाजता पेन्शनची मुदत संपत असल्यामुळे सकाळची न्याहारी आटोपून पेन्शनच्या मागे असणा-या झ-याकाठी थोडा वेळ चक्कर मारुन सामानाची आवराआवर सुरु केली. एव्हाना बॅंडच्या सदस्यांची तालीमही व्यवस्थित झाली होती. पेन्शनच्या काका-काकूंचा निरोप घेउन १२ वाजता परतीला निघालो. वाटेत एक छान नैसर्गिस ओनसेन आहे असं कळालं. मग गाड्या तिकडे वळवल्या. जसं चौपाटीवर गेल्यावर भेळ खाल्याशिवाय चौपाटीवर गेल्याची मजा येत नाही तसं जपानमध्ये सहलीला जाउन ओनसेनमध्ये गेलो नाही तर सहल पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. भुरुभुरु पडणा-या पावसात नैसर्गिक ओनसेनच्या गरम पाण्यात डुंबण्यात वेगळीच मजा असते. अर्धा-एक तास ओनसेनमध्ये डुंबून दुपारचं जेवण उरकून पुन्हा एकदा 'तोहोकु' सहलीच्या आठवणी मनात साठवून टोकियोच्या परतीच्या प्रवासाला लागलो.(आणखी छायाचित्रे इथे पाहा.)
मराठी टंकलेखन
माझा ब्लॉग प्रकाशित झाल्यापासून अनेक जणांनी विचारलं की आम्हालाही मराठीत कसं लिहीता येईल? कोणत्याही एका संकेतस्थळावर मराठी किंवा देवनागरी टंकलेखनाविषयी सर्वसमाधानकारक माहिती उपलब्ध नाही असं लक्षात आल्यामुळे हा लेखनप्रपंच करायचं ठरवलं. अर्थात हे फक्त मा.सॉ.(मायक्रोसॉफ्ट) प्रणालींसाठीच, कारण मी तीच वापरतो.
मायक्रोसॉफ्टने नविन विंडोज् आणि ऑफिस मराठी संवाद माध्यम संच बाजारात आणल्यापासून मराठीसाठी वापरल्या जाणा-या संगणकांचे दोन गट पडले आहेत. पहिला गट म्हणजे ज्यांच्याकडे विंडोज् एक्स.पी. व ऑफिस २००३ आहे तो आणि दुसरा गट म्हणजे ज्यांच्याकडे इतर प्रकारचे विंडोज् किंवा ऑफिस आहे. आता या दोन्ही गटांमध्ये मराठीतून लिहीण्यासाठी काय करावे लागेल ते पाहू.
पहिल्या गटासाठी हे काम मायक्रोसॉफ्टनं फारच सोपं केलं आहे. नविन विंडोज् आणि ऑफिस मराठी संवाद माध्यम संच डाउनलोड करून इंस्टॉल केल्यास प्रश्नच मिटला. यामुळे विंडोज् व ऑफिसमधील जवळजवळ सर्व संहिता(programmes) आणि मेनू मराठीत बदलले जातील. नियंत्रण पटल(control panel) उघडून त्यात थोडेसे बदल केले की तुम्ही मराठीतून लिहायला मोकळे. ह्या बदलांविषयी पुढे लिहीलेलेच आहे. सध्या मी ह्याच प्रकारे माझा वैयक्तिक संगणक वापरतोय. मराठीतून संगणक वापरण्याचा
आनंद काही औरच असतो. त्यातून गुगल निरोप्या (google talk) वर मराठीतून लिहीता आल्यापासून तर हा आनंद द्विगुणीत झालाय. हां, पण "मला तर हे मेनू समजतच नाहीयेत, आमची आपली आधीचीच English OS बरी." किंवा "काय करणार, इंग्लीशची इतकी सवय झालीये ना की मराठी वापरताच येत नाही मुळी" असं म्हणणारीही बरीच मंडळी असतात. शिवाय काही लोकांना कार्यालयातील संगणकावर हा प्रयोग करता येत नाही. त्यांच्यासाठी आणखी एक उपाय आहे. मराठी संवाद माध्यम संच न वापरताही मराठीतून लिहीण्यासाठीची कृती खाली देत आहे.
Enabling South Asian Language Support :
Windows XP:
1. Navigate to: Start > Control Panel > Date, Time, Language, and Regional Options
2. Click on "Add Other Languages"
3. In the dialog window, select the "Supplemental Language Support" tab.
4. Check "Install files for complex script and right-to-left languages (including Thai) and click "Ok." Windows may require you to insert the original installation CD to complete the installation.
5. Reboot the computer.
Activating Keyboard Layouts:
Windows XP:
1. Navigate to: Start > Control Panel > Date, Time, Language and Regional Options
2. Click on Add Other Languages"

4. Click on "Details" under the "Text Services and Input Languages" header.
5. Under the "Installed Services" menu, select "Add." This will take you to a dialog window which will allow you to add language input services, including assorted keyboard layouts for South Asian languages.
माझ्या मते ही कृती विंडोज् २००० आणि ऑफिस एक्स.पी. साठीही चालू शकेल. पण या प्रकारात एक अडचण आहे. विंडोज् च्या मराठी कळफलकाचा आराखडा इंग्रजी अक्षरांच्या उच्चारांप्रमाणे(phonetic keyboard) नाही. त्यामुळे आपण बोलतो तसे लिहिता येत नाही . त्याकरिता पडद्यावरील कळसंचाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सुरवातीला टाईप करताना अडतण येते. पण सवय झाल्यावर मात्र त्यासारखी मजा नाही. या संकेतस्थळावर याविषयी आणखी माहिती मिळू शकेल.
आता दुस-या गटाचा विचार करु. यामध्ये विंडोज् एक्स.पी. व्यतिरिक्त इतर नियंत्रण प्रणालींचा समावेश होतो. अर्थात एक्स.पी. वापरणा-यांसाठीही हा पर्याय उपलब्ध आहेच. बरहा किंवा अक्षरमाला यासारखी सॉफ्टवेअर वापरुन या प्रकारात मराठी टंकलेखन करता येतं. शिवाय यात मराठी उच्चारांप्रमाणे कळफलकावरील कळा वापरता येत असल्यामुळे हा दुसरा प्रकार बहुतांश लोकांना जास्त सोपा पडेल. बरहा डाउनलोड केल्यावर मराठीतून लिहिण्याच्या पाय-या अशा.
१. बराहा डायरेक्टच्या आयकन वर टिचकी (एक किंवा दोन, चवीनुसार;) मारा
२. संगणक फलकाच्या खालील-उजव्या कोपऱ्यात (जिथे सामान्यतः घड्याळ असते) बराहा डायरेक्ट चे चिह्न दिसेल.
३. F12 कळ दाबली असता "बराहा डायरेक्ट युटिलिटी" ची खिडकी उघडेल.
४. त्यात "इंडियन लँग्वेज" आणि "आउटपुट फॉरमॅट" निवडा.
५. इंग्लिश-मराठी उडी इथे F11 कळ दाबल्याने मारता येईल.
६. आता ओपनऑफिस रायटर (किंवा वर्ड, किंवा कोणतीही युनिकोड ओळखणारी प्रणाली) ची खिडकी उघडून थेट मराठीत लिहायला सुरू करा!
७. विंडोज डब्यावर भारतीय भाषासंच इंस्टॉल नसल्यास नोटपॅड मध्ये जोडाक्षरे, वेलांट्या बरोबर दिसत नाहीत. पण ओपनऑफिस मध्ये अगदी आरामात मराठीत लिहू आणि सुरक्षित करू शकतो.
(सौजन्य : शशांक जोशी)
मी पहिल्या प्रकारात मोडत असल्यामुळे या सॉफ्टवेअर विषयी मला फारशी माहिती नाही. पण मराठी टंकलेखनासाठी हाही एक चांगला पर्याय आहे असं ब-याच जणांकडून ऐकलं आहे.
या विषयावरील आणखी माहितीसाठी विकीपीडीयाचा उपयोग होईल.
तेव्हा मंडळी, चला, पुन्हा एकदा करुया संगणकाचा 'श्रीगणेशा', मराठीतून !
मायक्रोसॉफ्टने नविन विंडोज् आणि ऑफिस मराठी संवाद माध्यम संच बाजारात आणल्यापासून मराठीसाठी वापरल्या जाणा-या संगणकांचे दोन गट पडले आहेत. पहिला गट म्हणजे ज्यांच्याकडे विंडोज् एक्स.पी. व ऑफिस २००३ आहे तो आणि दुसरा गट म्हणजे ज्यांच्याकडे इतर प्रकारचे विंडोज् किंवा ऑफिस आहे. आता या दोन्ही गटांमध्ये मराठीतून लिहीण्यासाठी काय करावे लागेल ते पाहू.
पहिल्या गटासाठी हे काम मायक्रोसॉफ्टनं फारच सोपं केलं आहे. नविन विंडोज् आणि ऑफिस मराठी संवाद माध्यम संच डाउनलोड करून इंस्टॉल केल्यास प्रश्नच मिटला. यामुळे विंडोज् व ऑफिसमधील जवळजवळ सर्व संहिता(programmes) आणि मेनू मराठीत बदलले जातील. नियंत्रण पटल(control panel) उघडून त्यात थोडेसे बदल केले की तुम्ही मराठीतून लिहायला मोकळे. ह्या बदलांविषयी पुढे लिहीलेलेच आहे. सध्या मी ह्याच प्रकारे माझा वैयक्तिक संगणक वापरतोय. मराठीतून संगणक वापरण्याचा
आनंद काही औरच असतो. त्यातून गुगल निरोप्या (google talk) वर मराठीतून लिहीता आल्यापासून तर हा आनंद द्विगुणीत झालाय. हां, पण "मला तर हे मेनू समजतच नाहीयेत, आमची आपली आधीचीच English OS बरी." किंवा "काय करणार, इंग्लीशची इतकी सवय झालीये ना की मराठी वापरताच येत नाही मुळी" असं म्हणणारीही बरीच मंडळी असतात. शिवाय काही लोकांना कार्यालयातील संगणकावर हा प्रयोग करता येत नाही. त्यांच्यासाठी आणखी एक उपाय आहे. मराठी संवाद माध्यम संच न वापरताही मराठीतून लिहीण्यासाठीची कृती खाली देत आहे.Enabling South Asian Language Support :
Windows XP:
1. Navigate to: Start > Control Panel > Date, Time, Language, and Regional Options
2. Click on "Add Other Languages"
3. In the dialog window, select the "Supplemental Language Support" tab.
4. Check "Install files for complex script and right-to-left languages (including Thai) and click "Ok." Windows may require you to insert the original installation CD to complete the installation.
5. Reboot the computer.
Activating Keyboard Layouts:
Windows XP:
1. Navigate to: Start > Control Panel > Date, Time, Language and Regional Options
2. Click on Add Other Languages"
3. In the dialog window, select the "Supplemental Language Support" tab.
4. Click on "Details" under the "Text Services and Input Languages" header.
5. Under the "Installed Services" menu, select "Add." This will take you to a dialog window which will allow you to add language input services, including assorted keyboard layouts for South Asian languages.
माझ्या मते ही कृती विंडोज् २००० आणि ऑफिस एक्स.पी. साठीही चालू शकेल. पण या प्रकारात एक अडचण आहे. विंडोज् च्या मराठी कळफलकाचा आराखडा इंग्रजी अक्षरांच्या उच्चारांप्रमाणे(phonetic keyboard) नाही. त्यामुळे आपण बोलतो तसे लिहिता येत नाही . त्याकरिता पडद्यावरील कळसंचाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सुरवातीला टाईप करताना अडतण येते. पण सवय झाल्यावर मात्र त्यासारखी मजा नाही. या संकेतस्थळावर याविषयी आणखी माहिती मिळू शकेल.
आता दुस-या गटाचा विचार करु. यामध्ये विंडोज् एक्स.पी. व्यतिरिक्त इतर नियंत्रण प्रणालींचा समावेश होतो. अर्थात एक्स.पी. वापरणा-यांसाठीही हा पर्याय उपलब्ध आहेच. बरहा किंवा अक्षरमाला यासारखी सॉफ्टवेअर वापरुन या प्रकारात मराठी टंकलेखन करता येतं. शिवाय यात मराठी उच्चारांप्रमाणे कळफलकावरील कळा वापरता येत असल्यामुळे हा दुसरा प्रकार बहुतांश लोकांना जास्त सोपा पडेल. बरहा डाउनलोड केल्यावर मराठीतून लिहिण्याच्या पाय-या अशा.
१. बराहा डायरेक्टच्या आयकन वर टिचकी (एक किंवा दोन, चवीनुसार;) मारा
२. संगणक फलकाच्या खालील-उजव्या कोपऱ्यात (जिथे सामान्यतः घड्याळ असते) बराहा डायरेक्ट चे चिह्न दिसेल.
३. F12 कळ दाबली असता "बराहा डायरेक्ट युटिलिटी" ची खिडकी उघडेल.
४. त्यात "इंडियन लँग्वेज" आणि "आउटपुट फॉरमॅट" निवडा.
५. इंग्लिश-मराठी उडी इथे F11 कळ दाबल्याने मारता येईल.
६. आता ओपनऑफिस रायटर (किंवा वर्ड, किंवा कोणतीही युनिकोड ओळखणारी प्रणाली) ची खिडकी उघडून थेट मराठीत लिहायला सुरू करा!
७. विंडोज डब्यावर भारतीय भाषासंच इंस्टॉल नसल्यास नोटपॅड मध्ये जोडाक्षरे, वेलांट्या बरोबर दिसत नाहीत. पण ओपनऑफिस मध्ये अगदी आरामात मराठीत लिहू आणि सुरक्षित करू शकतो.
(सौजन्य : शशांक जोशी)
मी पहिल्या प्रकारात मोडत असल्यामुळे या सॉफ्टवेअर विषयी मला फारशी माहिती नाही. पण मराठी टंकलेखनासाठी हाही एक चांगला पर्याय आहे असं ब-याच जणांकडून ऐकलं आहे.
या विषयावरील आणखी माहितीसाठी विकीपीडीयाचा उपयोग होईल.
तेव्हा मंडळी, चला, पुन्हा एकदा करुया संगणकाचा 'श्रीगणेशा', मराठीतून !
Subscribe to:
Posts (Atom)